Top News औरंगाबाद महाराष्ट्र

“शिवजयंतीवरुन राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये”

Photo Credit - Ajit Pawar/ facebook, Udhhav Thackarey/Facebook & Dhananjay Munde/ Facebook

औरंगाबाद | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महारांजांची जयंती काही दिवसांवर आली आहे. मात्र राज्य सरकारने यंदाच्या वर्षी शिवजयंती साजरी करताना नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत फक्त 100 लोकांना एकत्र येऊन शिवजयंती साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

विरोधकांकडून टीका होत असताना सत्ताधाऱ्यांमध्ये देखील या निर्णयाबाबत मतभिन्नता असल्याचं दिसून आलं. शिवजयंती संदर्भातला जीआर बदलवायला हवा असं यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे, असं वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. आता औरंगाबाद येथे पत्रकरांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंती साध्यापणाने साजरी करावी, असं आव्हान केलं आहे.

काही लोक शिवजयंतीबाबत नाहक राजकारण करत आहेत. शिवजयंती साधेपणानं साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही जण शिवजयंतीवर बंधन का आणता?, अशी टीका करत आहेत. पण कोरोना वाढतो आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे या विषयावर राजकारण करून लोकांना कुणीही भावनिक करू नये, असा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावला आहे.

शिवजंयती संदर्भात भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज असते तर त्यांनीसुद्धा हाच निर्णय घेतला असता. त्यांनी सुद्धा नजतेच्या रक्षणालाच प्राधान्य दिलं असतं, असं उदयनराजे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

“…त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?”

‘पडळकराचं वय किती पवारसाहेबांचा अनुभव किती’; जयंत पाटलांचा पडळकरांना टोला

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर आमदार महेश लांडगे म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या