मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे भाजपचा हात आहे, असे राज्यातील आणि देशातील मोठे नेते म्हणत होते. तर दुसरीकडे भाजप मात्र धुतल्या तांदुळाची भुमिका घेत, आमचा यात काही संबंध नाही, हे शिवसेनेचे अंतर्गत बंड आहे असे म्हणत होता. पण त्याच्यावर फार काळ पडदा राहिला नाही. स्वत: उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला.
फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) रात्री वेशांतर करुन बाहेर एकनाथ शिंदेंना भेटायला जायचे. त्यावर आता राष्ट्रवादी नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला आहे. एकीकडे फोडोफोडी करत होते, तर दुसरीकडे आमचा काही संबंध नसल्याचा दावा करत होते, असा टोला अजित पवारांनी लगावला.
भाजपने फोडाफोडीचे राजकारण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पदावरून घालवले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे अजित पवार म्हणाले. सत्ता येत-जात असते, कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. तेव्हा येणाऱ्या काळात जनता काय तो निर्णय घेईल, असा इशारा देखील त्यांनी या वेळी भाजप-शिंदे गटाला दिला.
पक्षांतरबंदी कायद्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या, असे यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशात कधीच घडले नव्हते. त्यामुळे याच्यांकडून लोकशाहीची थट्टा सुरु आहे. शिंदे फडणवीस सरकार येऊन पंधरा दिवस उलटूनही अद्याप यांचे खातेवाटप नाही. राज्यात पूरस्थिती असताना जिल्ह्यांना पालक मंत्री नाही. माईक घेणे, चिठ्ठ्या देणे यावरुन मला या सरकारच्या भवितव्याची चिंता वाटते असे पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले
मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला
संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला
‘हे तर आणीबाणीपेक्षाही भयंकर’, शिवसेनेची मोदी सरकारवर सडकून टीका
मुंडे बहिण-भावांमध्ये जुंपली, श्रेयवादासाठी चढाओढ
Comments are closed.