बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता”

मुंबई | शिवसेनेेचे नेेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या भाजपकडे आश्रयीत आहेत. त्यांनी बंड करुन अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. त्यांनी भाजपसोबत युती करत सत्ता मिळवली. आता ते शिवसेना (Shivsena) पक्षावर आणि त्यांच्या निवडणूक चिन्हावर दावा करत आहेत. त्यांना या युतीत मुख्यमंत्रीपद मिळालं खरं, पण त्यात काहीतरी काळं बेर आहे, असं अजित पवार यांनी विशेष अधिवेशनातील आपल्या भाषणात सांगितलं होतं.

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (Chanrakant Patil) यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली. मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे असून देखील केवळ पक्षाच्या आदेशानुसार त्याचा मान राखत आम्ही काळजावर दगड ठेवत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. त्यांचं हे वक्तव्य फारच गाजलं. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली. आता अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना धारेवर धरलं आहे.

भाजपला सरकारमध्ये येण्याची भूक होती. ती छाताडावर किंवा आणखी कुठेतरी दगड धोंडा ठेऊन भागवली आहे ना? बरं झालं एखादा मोठा दगड ठेवला नाही. नाहीतर जीवच गेला असता, म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला, असा टोला अजित पवारांनी पाटलांना लगावला. तसेत भूकंप भूकंप करत सरकार स्थापन केलं आहे ना? मग आता मंत्रीमंडळ विस्तार करुन कामाला लागा, असा सल्ला देखील अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला.

राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांच गंभीर परिस्थिती उद्भवली आहे आणि अजून नवीन सरकारचे खातेवाटप नाही. यावरुन अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. जिल्ह्यांना लवकरात लवकर पालकमंत्री दिला गेला पाहिजे जेणे करून अशा स्थितीत नागरीकांचे हाल होणार नाहीत, असे देखील अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत” 

काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर

‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका

‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं

जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More