बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका

कोल्हापूर | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या सरकारची दोरी ही देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) हातात आहे, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे सुरु आहे. कारण गेले काही दिवस त्यांच्या पत्रकार परिषदा आणि विधानसभेतील भाषणे यात फडणवीस शिंदेंवर शिरजोरी करताना पहायला मिळाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात (Kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत असताना तसाच प्रकार घडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरातील लोकप्रतिनिधींची नावे घेताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चिठ्ठीवर काहीतरी मजकूर लिहून ती शिंदेंना दाखविली आणि हा प्रकार पत्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. याच प्रकारावर बोट ठेवत विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) टीका केली आहे. आम्ही सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मी एकमेकांचा मान ठेवला. पण आता येथे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा माईक खेचत आहेत. नावांवरुन मानापमान सुरु आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.

कोल्हापूरात लोकप्रतिनिधींची नावे घेताना एकनाथ शिंदे यांनी धैर्यशिल माने यांचे नाव घेतले. आबिटकर, क्षीरसागर यांची नावे घेतली पण, धनंजय महाडीक यांचे नाव घेतले नाही. म्हणून फडणवीसांनी त्यांचे नाव चिठ्ठीवर लिहून चिठ्ठी त्यांना दिली. ही तर सुरुवात आहे. सुरुवातीलाच अशी ओढाओढ, चिठ्या देणं सुरु झाले आहे तर पुढे काय होणार, हे महाराष्ट्राने पहावे, असा टोला अजित पवारांनी लगावला.

शिंदे यांचे पाय खेचणं आणि त्यांना लगामात ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत का? असा प्रश्न या घटनांवरुन उपस्थित होतो. कारण विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील एकनाथ शिंदे यांचे तुफान भाषण अश्र्ववेगाने सुरु असताना फडणवीस त्यांना तोंडावर हात ठेऊन पुरे पुऱे करत होते. त्यामुळे संशयाला जागा मिळत असून त्याचा पुरेपुर फायदा अजित पवार आणि विरोधी पक्ष घेत आहेत.

थोडक्यात बातम्या –

‘एकनाथ शिंदेंनी तुम्हाला राजकीय कुबड्या दिल्या’, निलेश राणे दीपक केसरकरांवर बरसले

शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…

मोठी बातमी! नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारकडून स्थगिती

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खलबतं होणार?

राज्यात पावसाचा जोर ओसरणार पण…; हवामान विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More