शेलारांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
पुणे | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्दे गाजत आहेत. सध्या राजकीय वातावरण तापलं असताना भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल (NCP) गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली.
भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा 2017 मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती. मात्र शिवसेनेसोबत आमचं जमणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता, असा गौप्यस्फोट शेलारांनी केला होता. शेलारांच्या या दाव्यावरून राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केली आहे.
भाजपकडून 2017 मध्येच राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची ऑफर होती. मात्र, राष्ट्रवादीने नकार दिला, हे सगळं आशिष शेलार आता का सांगत आहेत? त्यांनी हे आधीच सांगायचं ना. पाच वर्षानंतर अचानक आता शेलारांना हे आठवलं का? इतके वर्ष का थांबले होते?, असे सवाल अजित पवारांनी उपस्थित केले.
दरम्यान, पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी शेलारांवर निशाणा साधला. तर त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे, असं देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”
“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”
राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा
शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले..
ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…
Comments are closed.