बारामतीत अजित पवारच ‘दादा’; शरद पवारांचं टेंशन वाढलं

पुणे | राज्यात 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणूकींची ( Grampanchyat Election) रणधुमाळी सुरु आहे. आज सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे निकाल आहेत. संपुर्ण राज्याचे लक्ष बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Nationalist Congress Party) फुटीनंतर बारामती (Baramati) तालुक्यातील ही पहिलीच निवडणूक आहे.

बारामती तालुक्यात 32 गावांच्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहिर झाली होती. त्यापैकी एका ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर, उर्वरित 31 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. आज  त्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल समोर आलाय.

बारामती तालूक्याच्या राजकारणारात पुन्हा एकदा अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वर्चस्व सिद्ध केलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अजित पवार गटाने 31 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बारामतीमध्ये कोणाचं वर्चस्व राहणार असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात रंगले होते. आजच्या ग्रामपंयचातीच्या निकलावरुन बारामतीमध्ये अजित पवारांचा बोलबोला पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी त्यांचं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

दरम्यान, राज्यात 2359ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल आहे. राज्यतील ग्रामपंचायतीच्या निकालांमध्ये अजित पवारांचा गट दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 140 ग्रामपंचायतीवर अजित पवार गटानं वर्चस्व प्रास्थापित केलं आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीचा निकाल जल्लोषात पार पडत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने 231,शिंदे गट 126, अजित पवार गट 140, शरद पवार गट 54 , काँग्रेस74  आणि ठाकरे गटाने 50 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपला मोठा झटका; ‘या’ ठिकाणी महाविकास आघाडीचा बोलबा

मोठी बातमी! ऐन दिवाळीत छत्री घेऊन बाहेर पडा; हवामान विभागाचा इशारा

मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, आता केली ‘ही’ मोठी घोषणा!

याची देही याची डोळा!, रेकॉर्डब्रेक लोकांनी पाहिला ‘विराट’ सोहळा!

बीडमध्ये घरं पेटवलेल्या आंदोलकांचं आता काही खरं नाही… धनंजय मुंडे अॅक्शनमध्ये