अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; लंकेंविरोधातला उमेदवार ठरला

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज तिसऱ्या यादीची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरील सस्पेन्स कायम आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याकडे पुन्हा जाणारे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नीविरोधातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पारनेरमधून अजित पवार (Ajit Pawar) गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत.

तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांची घोषणा

या तिसऱ्या यादीत नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा होईल असा अंदाज होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम आहे. नवाब मलिक हे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या ऐवजी त्यांची कन्या सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप बनकर यांच्यावरच दुसऱ्यांदा विश्वास ठेवण्यात आला आहे. भाजपाचे यतीन कदम यांनी देखील या जागेवर दावा करत अजित पवार यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरू होत्या.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी

गेवराई – विजयसिंह पंडित

फलटण- सचिन पाटील

निफाड – दिलीपकाका बनकर

पारनेर – काशिनाथ दाते

महत्त्वाच्या बातम्या- 

‘राजकारणातील टरबुज्या…’; बड्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

2025 मध्ये ‘या’ 4 राशींना शनी बनवणार धनवान

‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला; ‘हा’ नेता देणार धंगेकरांना टफ फाईट

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका!