बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, जरा तरी माणुसकीचे भान ठेवा”

मुंबई | कालपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची चांगलीच खेळी रंगली होती. स्वप्निल लोणकर या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे काल सभागृहामध्ये विरोधकांनी एमपीएससीचा मुद्दा लावून धरला होता. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जूलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली.

अजित पवार यांच्या या घोषणेनंतर राज्यात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच भाजपचे नेते आणि विधानसभेचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार ही वेळ भुलथापांची व राजकारण करण्याची नाहीये, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

गोपीचंद पडळकरांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी इथे आमचा होतकरू मित्र स्वप्नील लोणकरनं सरकारच्या नाकर्तेपणामुळं आपलं जीवन संपुष्टात आणलं आहे आणि त्याच्या आईने आपल्या संपूर्ण राजकारण्यांवर आपला तळतळाट व्यक्त केला असल्याचं सांगितलं आहे.

जरा तरी माणुसकीचे भान ठेवा आणि खरोखर आपण उर्वरीत एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न कधी मार्गी लावणार आहात? ते सांगा. तुम्ही सभागृहात सांगताय 31 जुलै पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार आणि बाहेर येऊन फेसबुकवर सांगताय 31 जुलै पर्यंत फक्त एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा भरणार. स्वप्नीलच्या आईला खरं उत्तर द्या, असं पडळकरांनी म्हटलं आहे.


थोडक्यात बातम्या-

युनियनच्या गुंडगिरीला ‘राम कदम’ जबाबदार; राजू सापते आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा धक्कादायक आरोप

“भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या, आश्चर्य वाटतं की त्यांनी कपडे का नाही फाडून घेतले”

आयपीएलची रंगत आणखी वाढणार; आयपीएलमध्ये 8 नाही तर आता 10 संघ खेळणार

‘या’ जिल्ह्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डनंतर आता भारतात ‘ही’ लस देखील मिळणार मोफत

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More