दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघतायेत?

पुणे | दुष्काळ जाहीर करण्यासाठी चंद्रकांत पाटील मुहूर्ताची वाट का बघतायेत, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते.

यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. चंद्रकांत पाटलांनी 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. 

देशातील अनेक राज्यांनी दुष्काळ जाहीर केला असताना, हे सरकार एवढा वेळ का लावत आहे ? यातून या सरकारची मानसिकता दिसत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.   

दरम्यान, जलयुक्त शिवाराबाबत सत्तेत असणारी शिवसेना भाजपवर टीका करतेय. मात्र सत्तेत असणारे दोघे या परिस्थितीला जबाबदार आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही; शोभा डे यांचे मोदींवर टीकास्त्र

-…तर सरपंचही खासदारापेक्षा वरचढ ठरेल- संजय राऊत

-लोकसभेसाठी भाजप ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंना मैदानात उतरवणार?

-#MeToo मोहिमेनंतर आता #MenToo; पुरुषही अत्याचाराला वाचा फोडणार

-राष्ट्रवादीच्या बैठकीत चक्क बसण्याच्या जागेवरून राडा; पहा नक्की काय घडलं…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या