…तरी आम्ही शिवसेनेला दाद देणार नाही- अजित पवार

…तरी आम्ही शिवसेनेला दाद देणार नाही- अजित पवार

पिंपरी-चिंचवड | शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यासाठी संपर्क केला तरी आम्ही त्याला दाद देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवड येेथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलत होते.

भाजपचा अटल संकल्प असला तरी हे फेकू सरकार हटवणे हे ध्येय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेत युती होवो किंवा न होवो परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांशी आघाडी होणारच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

दरम्यान, हल्लाबोल आंदोलनानंतर आता दिवाळी झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसही राज्यभर मेळावे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

-धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी!

-काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी नाही- सुजय विखे

-…म्हणून तर नगरसेवक माझ्या नावाने ओरडतात- तुकाराम मुंढे

-जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार- उद्धव ठाकरे

-एकनाथ खडसेंचा ‘गॉडफादर’ कोण?; काय म्हणाले खडसे…

Google+ Linkedin