महाराष्ट्र सोलापूर

आता मी माझा 30 वर्षांचा अनुभव मी पणाला लावणार पण…- अजित पवार

सोलापूर | आगामी विधानसभेला मी माझा 30 वर्षाचा अनुभव पणाला लावणार पण या विधानसभा निवडणुकीत आम्ही 175 जागा जिंकणार, असा दावा करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला आव्हान दिलं आहे.

आमचं सरकार सत्तेत आल्यावर सरकारी आणि खासगी नोकरीत 75 टक्के आरक्षण लागू करणार असल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं आहे.

पुरोगामी शक्तींनी जातीयवादी शक्तींविरोधात एकत्र यावं. म्हणूनच वंचितने आमच्याबरोबर येऊन जातीयवादी शक्तींचा मुकाबला करावा, असं आवाहन अजित पवार यांनी वंचितला केलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आज ते सोलापूरमध्ये गेले होते. मात्र सोलापूरातील मुलाखतीला माढ्याचे बबन शिंदे आणि बार्शीचे दिलीप सोपल हे दोन आमदार गैरहजर होते.

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकात अखेर कमळ फुललं! येडीयुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

-…म्हणून श्रीरंग बारणे यांचं पंतप्रधान मोदींनी केलं तोंडभरून कौतुक

-शरद पवार की बाळासाहेब… राजकारणातील आदर्श कोण?; सचिन अहिर म्हणतात…

-चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणतात…

-नेत्यांच्या भरवशावर बसू नका; अण्णा हजारेंचा दिपाली सय्यद यांना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या