पुणे | इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी विविध विषयांवर तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 12 कोटींच्या रेड्याची गोष्ट उपस्थितांना सांगितली.
कोल्हापूरच्या प्रदर्शनामध्ये एक रेडा पाहिला. केवढ्याचा तर 12 कोटींचा. स्वप्नात देखील विचार केला नसेल, पण खरं सांगतोय, असं त्यांनी उपस्थितांना सांगितलं. तुम्हाला वाटंल हा काय टाकून-बिकून आलाय की काय?, असं ते यावेळी म्हणाले.
रेड्याचं नाव सुलतान आहे. पण हा रेडा सुंदर आहे, जसं घोडा सुंदर असतो तसं रेडाही सुंदर असतो, असं त्यानी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
या रेड्याचा खुराक किती तर 20 किलो सफरचंद, 6 ते 8 डझन केळी आणि 20 लिटर दूध, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या-
-2017-18 मध्ये बेरोजगारीच्या दरानं 45 वर्षांचा विक्रम मोडला- बिझनेस स्टँडर्ड
–अजित पवारांचं भाषण सुरु असताना जिल्हाध्यक्षांचं मोबाईलमध्ये तोंड, पुढं काय झालं?
-सोनिया गांधींचे निकटवर्तीय आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे चर्चा!
–पोटनिवडणूक : जिंदमध्ये भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने; काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
–राजस्थानच्या रामगडमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपला चारली पराभवाची धूळ