बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

पुणे | कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

लखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’

‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More