Ajit Pawar l आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात हा सोहळा पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते.
Ajit Pawar l अजितदादांच्या नावावर नवा विक्रम :
आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून ते सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे नेते ठरले आहेत. तसेच अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम केलं आहे. तसेच अजित पवार हे काँग्रेस आघाडीची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.
अशातच 2019 च्या सत्ता नाट्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. ही त्यांची उपमुख्यमंत्रिपदाची पाचवी टर्म ठरली. अशातच आज त्यांनी महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा या पदाची शपथ घेतली आहे.
News Title – ajit pawar took oath as Deputy Chief Minister of Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या :
“मी एकनाथ संभाजीराव शिंदे शपथ घेतो की…:; एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!
‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…’; महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व
‘महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र पर्व’, देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
सलमान खान ते सचिन तेंडुलकर..; महायुतीच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी