Ajit Pawar | मुंबई शहरात रात्रीपासून पावसाने नको केलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण आहे. मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस आहे. ठाणे शहरालाही पावसाने झोडपून काढलं. काही लोकांच्या घरात पाणी घुसलं आहे. काही भागात पूरजन्य परिस्थिती आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आहे. यामुळे एसटी बसेस आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्या आहेत. (Ajit Pawar)
रात्रभर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. रात्रभरात तब्बल 300 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने ही दाणादाण उडाल्याचं समोर आलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत एकूण किती पाऊस पडला आहे. त्याची माहिती दिली आहे.
अजित पवारांचं ट्विट जसंच्या तसं
“काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे”, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे.
हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 8, 2024
मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईची तुंबई झाली आहे. मात्र अशातच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टोकलं आहे. त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यामुळे आता मुंबईतील मुसळधार पावसाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. काँग्रेस नेते रवि राजा यांनी मुंबईतील तुंबलेल्या पाण्यामुळे विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे. (Ajit Pawar)
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
मुंबई शहरात नालेसफाई न झाल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. यामुळे आता महापालिकेची पोलखोल समोर आली आहे. यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही असं महापालिकेनं सांगितलं आहे. त्यासाठी महापालिकेने 250 कोटी रूपये खर्च केले होते. पण मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाल्याने पालिकेचे दावे सपशेल फोल ठरले आहेत. मुंबईत पाणी तुंबणार नाही, असा पालिकेनं दावा केला होता. तसेच राज्य सरकारने देखील सांगितलं होतं.
पण आता मुंबई जलमय झाल्याचं दिसून आलं. कुर्ला, साकीनाका आणि सगळ्या मुंबईत पाणी साचलं आहे. महापालिकेतून करदात्यांची लुटमार केली जात असल्याचं म्हटलं जातंय. तसेच सर्व मुंबईत पाणी साचलं आहे. यामुळे मुंबईकरांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
News Title – Ajit Pawar Tweet On Mumbai Rain Update
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईकरांनो जरा बचके! हवामान खात्याचा हायअलर्ट, पुढील 24 तास..
रायगडावर पावसाचं रौद्ररुप, पर्यटकांची उडाली तारांबळ; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात”; अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट
मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास