सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांना धक्का

Ajit Pawar Vs Yugendra Pawar | लोकसभा निवडणुकीचा निकाल पार पडला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला आहे. तर दुसरीकडे पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबात आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीच्या कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Ajit Pawar Vs Yugendra Pawar)

युगेंद्र पवारांची उचलबांगडी

युगेंद्र पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून बारामतीच्या कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला उपस्थित न राहिल्याने कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांना हटवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यावर आता शरद पवार आणि युगेंद्र पवार काय भूमिका घेतील हे पाहणं गरजेचं आहे. (Ajit Pawar Vs Yugendra Pawar)

यावर आता युगेंद्र पवार यांना कोणतीही माहिती दिली नसल्याचं ते म्हणाले. तसेच कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. तसं कोणतंही मला पत्र दिलं नसल्याचं युगेंद्र पवारांनी सांगितलं आहे. कुस्तीगीर संघटनेची बैठक बोलावण्यात आली होती त्यामध्ये काहीतरी निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत लगेचच युगेंद्र पवार यांनी कुस्तीगीर संघटनेच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद हा आता चव्हाट्यावर आला असल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीदिवशी सुप्रिया सुळे या बारामतीतील काटेवाडी येथील अजित पवार यांच्या आईकडे भेटीसाठी गेल्या होत्या. त्यामुळे आम्ही एकत्र कुटुंब असल्याचं दाखवून दिलं होतं. मात्र आता अजित पवार आणि युगेंद्र पवार (Ajit Pawar Vs Yugendra Pawar) यांच्यातील वाद चिघळणार असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

बारामतीत शरद पवारांचा विजय

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. अजित पवार यांनी अनेक सभा घेत लोकसभा निवडणुकीला मतदारांना विजयासाठी साद घातली होती. मात्र जे घडणार होतं तेच झालं. सुप्रिया सुळे यांनी आपली भावजय सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 47 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

News Title – Ajit Pawar Vs Yugendra Pawar Baramati Election News Update

महत्त्वाच्या बातम्या

पवार घराण्याला स्विकारावा लागला तिसरा पराभव, पाहा तिघांची नावं

सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल

पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका!, समोर आलेले आकडे अत्यंत धक्कादायक

पराभव लागला जिव्हारी; आणखी एका भाजप नेत्याने दिला राजीनामा

भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचा परिणाम, शेतकरी कर्जमाफी होणार?