बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

पुणे | राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदीर येथे पहिली घंटा झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फिल्मसिटी उत्तरप्रदेशमध्ये हलवण्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, मुंबईच्या फिल्मसिटीमध्येही अधिकच्या सुविधा पुरवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. कारण काही लोकांची योजना होती की बॉलिवूड बाहेरच्या राज्यामध्ये घेऊन जायचे. त्यासाठी काही मुख्यमंत्रीही आले. मात्र चित्रपटसृष्टी मुंबईतच राहावी यासाठी महाविकास आघाडी सर्व प्रयत्न करेल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.

यापुढे ते म्हणाले, जेव्हापासून चित्रपटसृष्टीची सुरवात झाली तेव्हापासून संपूर्ण देशाचे केंद्र मुंबईच आहे. ते मुंबईच राहावं. हीच सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे चित्रपटसृष्ठी मुंबईच्या बाहेर जाऊ देणार नाही, असं अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्मसिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. यावेळी बॉलिवूडलाही तेथे नेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरून अजित पवारांनी योगींना इशारा दिला आहे.

थोडक्यात –

लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक ‘वन अविघ्न पार्क’ला भीषण आग!

एनसीबीची धडक कारवाई; अजून एका ड्रग पेडलरला घेतलं ताब्यात

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

“तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More