मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात पुन्हा शाब्दिक मतभेद सुरु झाले आहेत. नाना पटोले यांनी गोंदियातील स्थानिका राजकारणावरुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
सध्या बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि गोंदियात भाजप-राष्ट्रवादीनं हातमिळवणी करुन काँग्रेसला वेगळं केलंय. यावरुन पटोलेंनी राष्ट्रवादीवर टीका केली. शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपसोबत राष्ट्रवादी युती करत असेल तर राष्ट्रवादीही शेतकरी विरोधी होईल असं पटोले म्हणाले आहेत. आता अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले.
नाना पटोले यांनी अशाप्रकारे जाहीरपणे बोलणं बंद करावं, अशा शब्दात अजित पवारांनी आपला राग व्यक्त केला आणि महाविकास आघाडीच्या बैठकीतही पटोलेंचा विषय मांडणार असल्याचं म्हटलंय.
महाविकास आघाडी जर टिकवायची असेल तर बैठकीत बोलले पाहिजे, मीडिया समोर बोलण्याची गरज नाही. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वारंवार मविआत काय तरी अलबेल असल्यासारखं बोलत असतात. त्यांच्या अशा बोललण्याने आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. यामुळे या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असं अजित पवार म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-