‘मी पहाटेच्या शपथिवधीबाबत..’, अजित पवार संतापले

मुंबई | 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत विवध चर्चा आजही रंगत असतात.

त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला होता. पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या(Sharad Pawar) संमतीने झाला होता, असं फडणवीसांनी सांगितलं होतं.

फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत खुलासा केल्यानंतर तो शपथविधी पवारांच्या परस्पर झाला होता, या चर्चांणा पूर्ण विराम मिळाला आहे. परंतु फडणवीसांच्या या प्रतिक्रियेनंतर अजित पवार मात्र याबाबत बोलण्यास टाळत आहेत.

गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहीले होते. कार्यक्रमानंतर पवारांनी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. तरीही पहाटेच्या शपथविधीबाबत अगदी मोजक्या शब्दांत पवारांनी उत्तर दिलं.

अजित पवार म्हणाले की, मी पत्रकारांना सांगितलं आहे की, मी पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मग तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा कशाला हा प्रश्न विचारता?, असा संतप्त सवालही अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या-