‘कुणीही गंभीर नाही, पहिलं बाकडं तर’; मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार भडकले

मुंबई | सध्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (MaharashtraBudget2023) सुरु आहे. आज चर्चा सुरू असताना मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच अनुपस्थित असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. यावेळी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

जेव्हा विरोधी पक्षनेते 293 चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल, तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचं?, असा सवाल मुंडेंनी केला.

दरम्यान, मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतोय की यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. पण भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं तर मोकळंच असतं, असं म्हणत अजित पवारांनी

महत्त्वाच्या बातम्या-