बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी काॅंग्रेसला आणखी एक धक्का; अजित पवारांना राजीनामा द्यावा लागणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपने(BJP) राष्ट्रवादी काॅंग्रेसला(NCP) मोठा धक्का दिला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आले आहेत. या मंडळाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) होते. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसला अजून एक धक्का मिळण्याची शक्यताय. विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याकडून एका संघटनेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे.

दिल्ली उच्च न्यायलयाच्या वतीने नियुक्त भारतीय ऑलंपिक महासंघाचे हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना (Anil khanna)यांनी 11 जुलैला या संदर्भातील परिपत्रक काढलं आहे. आता या परिपत्रकातील सुचनेनुसार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आपल्या घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यामुळे यातील नियमानुसार अजित पवारांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

परिपत्रकातील नियमानुसार, एका व्यक्तीला दोन टर्म किंवा आठ वर्षांपेक्षा जास्त काळ संघटनेवर राहता येणार नाही. अजित पवार 2013-17 आणि 2017 ते आतापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना या पदाचा राजिनामा द्यावा लागणार आहे. हे अध्यक्षपद सोडल्यानंतर पवारांना स्पोर्ट कोडनुसार पुढील पाच वर्षे एमओएमध्ये रेड कार्ड असेल. त्यामुळे त्यांना इतर पदावर संधी नसणार आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धक्का आहे.

दरम्यान, अनिल खन्ना यांनी सुत्र हाती घेताच संबधित संघटनेच्या घटनेवर आक्षेप घेतला आहे. त्यात अनेक त्रुटी असून तात्काळ स्पोर्ट कोड लागू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच या कोडमध्ये अनेक महत्वाचे नियम आहेत.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More