पुणे महाराष्ट्र

“लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का?”

सातारा | अजित पवारांना जरंडेश्वर कारखान्यातून आपल्या घरी माघारी घालवून कोरेगाव मतदारसंघात क्रांती घडवायची आहे, असं म्हणत माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

कारखान्याचे दहा हजार टनांचे एक्स्पांशन कोणाला विचारुन केलं? माझा अडीच हजार टन क्षमतेचा कारखाना मला पुन्हा पाहिजे. त्या व्यतिरिक्त जे काय असेल ते तुम्ही बारामतीला उचलून न्या, असंही शालिनीताई यांनी म्हटलं आहे.

मावळ मतदारसंघात जे झालं ते बरोबरच झालं. निवडणूक लढण्याआधी काही कामं करावी लागतात, असं म्हणत शालिनीताईंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

लोकसभा निवडणूक लढवणे म्हणजे काय घरची मालमत्ता आहे का? शिवाय एकाच परिवारातील किती जणांनी निवडणूक लढवायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-“नागपूरचं वासेपूर करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आहे”

-राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; पुण्यात या विद्यापीठाला स्वायत्त मान्यता

-मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार आहे- राधाकृष्ण विखे पाटील

-शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

-राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या