बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, संपूर्ण माहिती मिळताच तातडीने मदत करणार”

मुंबई | बंगालच्या उपसागरात चालू असणाऱ्या गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागाला फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून राज्यभरातून मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

मराठवाड्यातील पूरजन्य परिस्थितीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी होत आहे. परंतु महाविकास आघाडीचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे आणि आता देखील आहे.

तसेच प्रत्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अडचणीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचं काम चालू आहे. शेतकऱ्यांंना विमा कंपन्यांचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“आता जनतेच्या न्यायालयातच ‘या’ भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल”

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; ‘या’ 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी

देसी जुगाड! बैल आणि ट्रॅक्टरशिवाय पठ्ठ्यानं नांगरलं शेत; पाहा व्हिडीओ

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

“सब गोलमाल है! मी कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More