बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या’; अजित पवार मुख्यमंंत्र्यांशी करणार चर्चा

पुणे | कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना आता बाहेर पडायला आता परवानगी दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.  लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडायला परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी सोलापूरमधील एका गावाचं उदाहरण देत लोक कशाप्रकारे कोरोनाच्या नियमांचं पालन करत नाहीत याबाबत माहिती दिली. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले अशी बेपर्वाई बरी नाही. एक कोरोनाबाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज असल्याचं अजित पवांरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आरती घेतली. त्यावर पवार यांनी नापसंती दर्शवली. प्रत्येकानं नियम पाळणं गरजेचं आहे. नियमांचं उल्लंघन होत असेल तर ते चुकीचं असल्याचं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

बोल्ड चित्रपटांची तुलना पॉर्नशी करू नका, राजने मला…’; राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाची प्रतिक्रिया

मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलिसांची उडवाउडवीची उत्तरं; बापानं घेतला गळफास!

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही- आशिष शेलार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More