Ajit Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत देखील अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे असणार आहे. कारण बारामती मतदारसंघाची ओळख ही बहुप्रतिष्ठित मतदारसंघ अशी आहे. त्यामुळे बारामती विधासभा कोण गाजवणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. मात्र आता निवडणुकीपूर्वी एक महत्वाची माहिती मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढवणार नसल्याचं बोललं जात आहे.
अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत? :
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघ प्रचंड गाजला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीत देखील बारामती मतदारसंघ गाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात एक अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे. आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला जनतेने निवडून द्या असे अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या दिले आहेत. मात्र अजित पवार बारामतीमधून नव्हे तर मगकोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे यंदा बारामतीमधून नाही तर शिरूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. कारण शिरूर हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Ajit Pawar l अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही :
अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाच्या मुद्यांवर चर्चा सुरू आहे. अशातच मविआ आणि महायुती व इतर सर्वच पक्षांकडून निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी मुलाखत घेण्यासाठी देखील सुरूवात केली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील शिरूर हा मतदारसंघ भाजप पक्षाकडे आहे.
मात्र शिरूरमध्ये अद्याप कोणत्याही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शिरूर हा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण अजित पवार गटाकडे सध्या अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही, त्यामुळे खुद्द अजित पवार हेच शिरूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या संदर्भात अद्याप गोधन झालेली नाही. त्यामुळे लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.
News Title – Ajit Pawar will not contest from Baramati constituency
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मराठा पॅटर्न, नेमकी काय झाली घोषणा ?
“शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनी स्वत:ची पोरं काॅन्व्हेन्टमध्ये..”; किरण माने यांची पोस्ट चर्चेत
शिंदे गटाला मोठं खिंडार, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश
ऐन दिवाळीत शनीची वक्री चाल, ‘या’ 3 राशींचे सुरू होणार अच्छे दिन!
‘बिग बॉस’चा विजेता सुरज चव्हाणला बक्षीस म्हणून मिळाला 14 लाखांचा चेक अन्ं बरंच काही