बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अजित पवारच एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. अशात आरपीयआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

अजित पवारांविषयी मला आदर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणातही आहेत. आता ते म्हणत आहेत की, ‘कोणीही मायचा लाल सरकार पाडू शकत नाही.’ त्यावर मी असंच म्हणेन की, कोण आहे तो मायचा लाल, मला तर दिसतेय ही अजितदादांची चाल. त्यामुळे एक दिवस अजित पवार हेच सरकार पाडतील, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही. उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, त्यांना मुख्यमंत्री बननण्याची संधी मिळाली. चांगली गोष्ट आहे. एकत्र न येणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेलं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार कधी पडेल, हे सांगता येत नाही, असंही रामदास आठवले म्हणाले. यावेळी बोलताना आठवलेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबाबतही भाष्य केलं आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊ शकतो. असा विश्वास मला आहे. पुढे काय होतं ते बघू, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

“सोनिया गांधींची गुलामगिरी करत सत्तेचं लोणी खाणं बरं वाटतं का?”

“काँग्रेस नेते राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More