माघार की नवा डाव?; बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय

Ajit Pawar | बारामती लोकसभा निवडणूकीत नणंद-भावजयच्या लढतीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता याचाच धसका घेत अजित पवारांनी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवारांनी बारामती विधानसभेतून माघार घेतल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांनी धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आपणास आता निवडणूक लढवण्यात रस राहिला नाही. जय पवार याच्या उमेदवारीबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं.

आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे. मी सात, आठ वेळा निवडणूक लढलो आहे. त्यामुळे मला आता रस राहिला नाही. जय पवार यांच्याबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.

विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार (Ajit Pawar) यांच्याऐवजी त्यांचे पुत्र जय पवार रिंगणात उतरतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटलं की, शेवटी आपल्याकडे लोकशाही आहे. मला रस नाही. मी सात-आठ निवडणुका लढवल्यात.

अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवली नाही तर मग ते दुसऱ्या कोणत्या मतदारसंघातून लढणार, असा प्रश्न उपस्थित झाला होती. मात्र अजित पवार हे विधानसभा निवडणुकीत मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कारण अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Ajit Pawar | “महायुतीत कुठलाही वाद नाही”

दरम्यान, मुख्यमंत्रीबाबत महायुतीत कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत. आम्ही सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवत आहोत. आम्ही सगळे एकत्रित काम करत आहोत. विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31ऑगस्टपर्यंत करा अर्ज

कोलकाता ‘निर्भया कांड’वर आयुष्मान खुराणाची पोस्ट; व्हिडिओ पाहून तुमचंही मन सुन्न होईल

SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढवला, EMI एवढ्याने वाढणार

सुप्रिया सुळेंच्या भाषणावेळी गोंधळ, मराठा आंदोलक आले, अन्…, नेमकं काय घडलं?