बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचं बंद करा”

मुंबई | राज्यात महागाईचा भडका उडालेला पहायला मिळत आहे. यातच वीज कनेक्शनवरुन विरोधकांनी सरकावर टीकास्त्र  डागलं आहे. वीज कनेक्शन कापलं जात असल्यामुळे नागरिक हैराण आहेत. यावरुन आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

विजेच्या प्रश्नावर अजित पवार सभागृहात बोलले होते. राज्यातील एकाही शेतकऱ्याच्या विजेचं कनेक्शन कट केलं जाणार नाही, असं असूनही उर्जामंत्र्यांनी वीजबील भरलं नाही तर कनेक्शन कट केलं जाईल असं सांगितलं.

अद्यापही वीज कनेक्शन कापत असल्यामुळे अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, त्यांनी मोठेपणा दाखवायचा बंद करावा, असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.

दरम्यान, वीजबिल कनेक्शन कट करण्यावरुन सध्या शेककरी चिंतेत आहेत. एका शेतकऱ्यांनी तर व्हिडीओ बनवत आत्महत्या करण्याची घटनाही घडल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या  – 

“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”

अजित पवारांना झटका! पवारांच्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा

‘महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज’; संजय राऊत म्हणाले…

“…तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली”

Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More