बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“… त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री महोदय अजून किती सहन करायचं”

मुंबई | रविवारी मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी अजित पवारांनी मराठी द्वेष्ट्यांना चांगलंच सुनावलं आहे.

आपण दुकानावर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला तर कुणीतरी मराठी द्वेष्टे महाभाग न्यायालयात गेले. दुकानावर मराठी पाट्या लावाव्यात, स्थानिक भाषा सोयीची असते, असं मराठी द्वेष्ट्यांना न्यायालयाने सुनावलं, असं म्हणत अजित पवारांनी या लोकांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

तुम्ही तुमचं घर, जिल्हा, राज्य सोडता. पोटाची खळगी भरण्यासाठी इथे येता आणि मराठीचा द्वेष करायचा हे बरं नव्हं. मराठी मनाचा, संवेदनशीलतेचा अंत पाहू नका. मुख्यमंत्री महोदय मराठी द्वेष्ट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. किती दिवस सहन करायचं, असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, मराठी भाषेची उपयुक्तता वाढवली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मराठी भाषेची उपयुक्तता वाढवल्याशिवाय आपणही गप्प बसणार नाहीत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. तर अरे बाबांनो मराठी भाषेवर प्रेम करा, असंही अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

MSEB विरोधात शेतकरी आक्रमक, अज्ञातानं सबस्टेशन पेटवलं

“उद्धवजी अजूनही वेळ गेली नाही, विचार करा”

‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”

“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More