बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

पुणे |कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात यावी अशी मागणी होत होती. याचा पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुण्यातील सर्व दुकाने सकाळी सात पासून रात्री आठपर्यंत सुरू ऱाहणार आहेत. हॉटेल चालकांना रात्री 10 पर्यंत 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवार आणि रविवार सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

शहरातील मॉल हे रात्री आठपर्यंत सुरू ठेवता येणार असून मॉलमध्ये लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यापारी वर्गानेही आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करत सरकारला इशारा दिला होता.

दरम्यान, अजित पवारांनी पुण्याबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. संध्याकाळी आठ वाजता मुख्यमंंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणत्या घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, वाचा काय सुरू, काय बंद?

मुख्यमंत्री आठ वाजता साधणार जनतेशी संवाद, पुण्यातील निर्बंधांबाबत घोषणा करण्याची शक्यता!

‘राजीव गांधींचं नाव हटवताच भारताला सुवर्ण मिळालं’; ‘या’ निर्मात्याचं वादग्रस्त वक्तव्य

मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस- यशोमती ठाकूर

इयरबर्ड्स घालून गाणी ऐकताना अचानक झाला स्फोट, तरुणाचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More