बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार पण…’; अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांंनी नियमीतपणे कर्जफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ही मदत करणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवारांनी याबाबत विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीबाबतचा प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला जात आहे. सरकार मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत करणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ही मदत केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना कर्ज घेणं आणि परतफेड करणं सोपं होणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं पीककर्ज बिनव्याजी देण्याचीही घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली आहे. याआधी अजित पवारांनी यंदाच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला यामध्ये शेतकऱ्यांसाठीही अनेक घोषणा केल्या आहेत.

दरम्यान, तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आयेगा”

“…ते दृश्य पाहून रात्रभर झोपू शकलो नाही”, भर सभागृहात मुख्यमंत्र्याना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

रोहित पवारांच्या त्या ट्विटला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद; म्हणाल्या…

‘अशावेळी आर. आर. पाटील असते तर…’; मनसुख हिरेन प्रकरणावर मनसेची प्रतिक्रिया

‘वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली’; ‘या’ भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More