काँग्रेसला मोठं भगदाड! तब्बल 28 नगरसेवकांचा अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई । आगामी पालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात खळबळ पहायला मिळत आहे. सध्या राजकीय हालचाली सुरु असून मालेगावमध्ये याचे चांगलेच पडसाद पहायला मिळत आहे. अशातच मालेगावात काॅंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीमध्ये जरी सतत आश्वासने दिली जातात की सर्व एकमेकांसोबत आहोत. परंतू स्थानिक पातळीवर पक्ष फोडीची कामे चालूच आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने अशाच प्रकारे नाशिक जवळील मालेगावमध्ये काॅंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
चक्क महापौरांसह काॅंग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. माजी आमदार रशिद शेख आणि महापौर ताहेर शेख यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश पार रडला .
यावेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही सर्व नगरसेवकांनी शेख रशिद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या नगरसेवकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याच आश्वासन दिलं आहे.
थोडक्यात बातम्या –
‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’; श्वेता तिवारीच्या वक्तव्यानं खळबळ
“बिग बॉसमुळे माझे आयुष्य खराब झाले, माझे करिअर संपविण्याचीही धमकी मिळाली”
लाखो जणांच्या दिलाची धडकन असणारी अभिनेत्री मौनी राॅय अखेर अडकली लग्नबंधनात
‘लघु, सुक्ष्म दिलासा’! मिलिंद नार्वेकरांचा नितेश राणेंना खोचक टोला
IPL 2022 ! किंग कोहली पुन्हा कर्णधार होणार?; आरसीबीने स्पष्टच सांगितलं…
Comments are closed.