अजित पवारांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का, पार्थ पवारांना स्थान मात्र मुंडेंना वगळले!

Delhi Elections

Delhi Elections l दिल्ली विधानसभा निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. फेब्रुवारी महिन्यात 70 जागांसाठी मतदान होणार असून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) देखील या निवडणुकीत सहभागी होणार आहे.

राष्ट्रवादीने दिल्ली विधानसभेसाठी रणशिंग फुंकले असून स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), तसेच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचा समावेश आहे. मात्र, माजी स्टार प्रचारक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नावांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पार्थ पवारांना संधी, धनंजय मुंडेंना वगळले :

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या 20 स्टार प्रचारकांच्या यादीत पार्थ पवार यांना विशेष संधी देण्यात आली आहे. पक्षाच्या या यादीत अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल (Praful Patel), फैज अहमद (Faiz Ahmed) यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. मात्र, यादीत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.

धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वादळाचा सामना करावा लागत आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून अजित पवारांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Delhi Elections l दिल्लीतील राजकीय समीकरण :

दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल 8 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. भाजपने यापूर्वीच 68 उमेदवारांची यादी जाहीर केली असून दोन जागा मित्रपक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत 11 उमेदवारांची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीने दिल्लीच्या राजकीय मैदानात उडी घेतल्याने नव्या राजकीय समीकरणांचा अंदाज वर्तवला जात आहे. पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अनेक मुद्दे स्पष्ट होत आहेत. पार्थ पवारांना संधी देणे हा पक्षाच्या नवीन नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

News Title : Ajit Pawar’s big blow to Dhananjay Munde

महत्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य: स्वामींची कृपा होणार, या राशींसाठी नशिबाचे दार उघडणार

सैफ सोबत नक्की काय घडलं? जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे

मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट!

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

पुण्यात सुसाट कंटेनरने तब्बल ‘इतक्या’ जणांना उडवले!

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .