बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वेदांता प्रोजेक्टवरून अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले…

मुंबई । वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxcon) हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. पण तो गुजरातमधील धोलेरा इथे होणार आहे. या प्रकल्पातुन जवळजवळ दिड लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार प्राप्त झाला असता. शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thakarey) वेदांता प्रकल्पावरून केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारवर सध्या चौफेर टीका होत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातुन पवारांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा, अशी मागणी अजित पवारांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

पुण्यातील तळेगावमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. वेदांताचा हा प्रकल्प एकूण 1 लाख 58 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा आहे. मात्र तो महाराष्ट्रातुन निसटलाच कसा असा प्रश्न अनेक नेत्यांकडून विचारण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी गुजरातने 1 हजार एकर जमीन कोणतेही शुल्क न घेता दिली आहे. तसेच 20 वर्षासाठी वीज आणि पाणी देखील सवलतीच्या दरात देऊ केले आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More