‘शरद पवारांनी…’; तांबेंच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
सत्यजितला उमेदवारी दया असं स्वत: शरद पवार साहेबांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली, असं अजित पवारांनी सांगितलं.
आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये. सत्यजितला पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं. पण अंतिम निर्णय हा सत्यजितनेच घ्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, राज्यातील अमरावती आणि नाशिक पदवीधरसह नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघापैकी चार मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत.
नागपूर,औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी(maha vikas aghadi) ला विजय मिळाला आहे. तर नाशिकमध्ये अपक्षाने बाजी मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.