बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील लॉकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य म्हणाले…

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानं एकवेळ बंद राहणार आहेत. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा वर डोके काढले आहे. 3 ते 4 महिने थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर शहरांत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून हा आकडा दररोज वाढत आहे.

दरम्यान, पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधितग्णां रुची नोंद झाली. यावरुन गेल्या तीन दिवसांत पुण्यात कोरोना किती वेगाने पसरतोय, हे समजायला मदत होते आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात पुन्हा एकदा टेस्टिंगची संख्यादेखील वाढवली आहे. तसंच लसीकरण देखील जोरात सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टला टक्कर देणार भारताचा ‘अलिबाबा’; जाणून घ्या अधिक माहिती…

रस्त्यावर आडवं पडून सरकारविरोधात घोषणाबाजी, पडळकरांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल!

मास्क आणि पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जण जखमी

नवऱ्याला खुर्चीला बांधलं, दाखवला पाॅर्न व्हिडीओ आणि धारदार चाकूनं कापला…

‘तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’; अनिल बोंडे आणि पोलिस अधिकाऱ्यात बाचाबाची! पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More