बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांचं सभागृहात मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने आले.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कसं असेल याची झलक सुरुवातीलाच पाहायला मिळाली. सलग दुसऱ्या दिवशीदेखील विरोधक आक्रमक झालेत.

पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Monsoon Session ) दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. आपल्याला कधीही एकत्र यायला लागू शकतं, असंही ते म्हणालेत.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More