बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…असं काही घडलंच नाही’; 12 आमदारांच्या निलंबनावर अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांना (12 MLA) निलंबीत करण्यात आलं होतं. सभागृहात गोंधळ घालणे आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपावरून भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कोणताही विषय डोळ्यासमोर 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं नाही. त्यावेळी सभागृहात ज्यांनी ज्यांनी ती परिस्थिती पाहिली, त्यांनी माहिती असेल. आम्ही अनेक अधिवेशनं पाहिली आहेत. कधी कधी एखादा विषय खूप तापला जातो आणि त्यावर खूप टोकाची चर्चा होते. परंतु, शारिरीक आणि काही वेगळं भाषा वापरणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल महोद्यांकडे 12 आमदारांची नावं पाठवली होती. त्यामुळे काहींनी असा समज करून घेतला की ती 12 होत नाहीत, म्हणून ही 12 कमी करण्यात आली आहेत. मात्र,मी समस्त जनतेला सांगू इच्छितो की असं काही घडलं नाही, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

दम्यान, उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अधिवेशनात 12 आमदारांच्या प्रश्नावरून देखील वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“…त्याची ठाकरे सरकारला जराही शरम वाटली नाही”, चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

ममतांचा जलवा कायम! भाजपला धूळ चारत पुन्हा गड राखला

नानांसह ‘या’ दोन नेत्यांना हायकमांडकडून समन्स, लगोलग दिल्लीला बोलावलं

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा झटका

‘…म्हणून मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष केलं’; मोदींनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More