बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच म्हटलं होतं की…’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या मनातली ईच्छा बोलून दाखवल्याची चर्चा आहे. भाषणादरम्यान, दादा तुम्ही गृहमंत्री व्हा अशी ईच्छा कार्यकर्त्याने व्यक्त करताच पवारही दिलखुलास बोलले. जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं, पण ऐकलं नाही, असं अजित पवार सांगितलं.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाषण केलं.

वरिष्ठांना वाटतं याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही, असं पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला. दरम्यान, गंमतीत अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.

मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. त्यात राष्ट्रवादीचा जरी कुणी म्हणत आला ‘दादा, पोटात घ्या’, तरी पोटात नाही ओठात नाही. सगळ्यांना नियम सारखाच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी जीवाचं रान करुन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण तोच जर चुकलेला असेल तर मी पांघरुण कसं घालणार. पांघरुण घालून घालून पांघरुणं संपायची वेळ येईल, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेणार

युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाची नवी खेळी, धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More