बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार धडाकेबाज कामासाठी आणि त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. लोणावळ्यातील पर्यटन विकासावरून अजित पवार यांनी लोणावळा बकाल करणाऱ्यांना दम भरला आहे. लोणावळा पर्यटन विकासावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.

सत्तेत असला तरी चुकीच वागू नका, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, सर्वांना नियम सारखे आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत इशारा दिला आहे. लोकांना त्रास होणार नाही, गुंड, दहशत आणि दादागिरी होणार नाही. लोणावळाकरांनो आपलं शहर चांगल दिसेल बकालपणा येणार नाही, पर्यटन हे काम खर्चिक आहे, पण आपल्याला करायचं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मी पण लोणावळ्यात अनेकदा आलोय. खासकरून उन्हाळ्यात तर यायचोच. खरं तर इथलं वातावरण खुप चांगलं आहे. इथे आल्यावर कोणी आजारी पडत नाही. आजारी असला तरी इथे येऊन ठणठणीत बरा होतो, असंही अजित पवार म्हणाले आहेत. तसेच महाबळेश्वरच्या धर्तीवर लोणावळ्यात पर्यटन विकास करायचा आहे, तुमची साथ असेल तर इथं चांगला विकास करूयात, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी बोलताना मास्कवरून उपस्थितांना सुनावलं. आज तुम्ही माझं लय जंगी स्वागत केलं. पण इथे माझ्या भगिनी आणि मित्रांच्या तोंडावर मास्क दिसले नाहीत. बाबांनो असं करू नका, तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू नका, असं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार फाॅर्म

परमबीर सिंह बेपत्ता! उच्च न्यायालयात राज्य सरकारची धक्कादायक माहिती

‘इंदिरा गांधी प्रशिक्षण भवन’ पाडून आता ‘नरेंद्र मोदी प्रशिक्षण भवन’ बांधणार

सर्वसामान्यांचं स्वप्न महागलं! कोळसा टंचाईमुळे वाढले बांधकाम साहित्याचे दर

“राणेंच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही, वेळ आली की कुंडली बाहेर काढू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More