बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवरून राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली. आमदार मोठ्या संख्येने शिंदे गटात जात असल्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमागे भाजपचा हात असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येत होता. सेनेच्या बंडखोर आमदारांचं सुरत येथे जाणं, भाजपचे काही नेते सुरत येथे दिसल्याने या मागे भाजप तर नाही ना, अशा चर्चा रंगत होत्या. मात्र, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला क्लिनचीट दिलं आहे.

आताच्या घडीला भाजपचा कोणताही मोठा चेहरा, मोठा नेता समोर येऊन काही करतोय असं दिसत नाही. त्यामुळे यामागे भाजपचा हात असेल असं वाटत नाही, असं मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, सरकार टिकवणं हे तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. आमचा उद्धव ठाकरेंना पूर्ण पाठिंबा आहे. महाविकास आघाडी सरकार टिकावं यासाठीच आमचे प्रयत्न असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चा होऊ शकते’; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना आवाहन

मोठी बातमी! आणखी दोन आमदार गुवाहाटीसाठी रवाना, शिवसेनेतील गळती कायम

‘आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

“कॅरम खेळण्यापुरते सुद्धा आमदार उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहणार नाहीत”

आता पुढं नेमकं काय होणार?, गुवाहाटीतून शिंदे गटातील आमदाराचा मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More