पुणे | वारीदरम्यान पंढरपूरमध्ये साप सोडणार असल्याचे विधान किंवा संभाषण कोणी केले असेल यावर माझा विश्वास नाही, जर असं कोणी केलं असेल तर ते संभाषण लोकांसमोर आणा, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
पंढरपूरच्या वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी करण्याचा काही संघटनांचा डाव आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल होतं. त्या वक्तव्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, मराठा मोर्चेकऱ्यांचा अंत पाहू नका, त्यांना आरक्षण द्या, मात्र 52 टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात प्रचारास येऊ देणार नाही; मराठा मोर्चेकऱ्यांचा इशारा
-… आणि एकदाचा मुहूर्त ठरला; बाजीराव मस्तानी करणार ‘या’ दिवशी लग्न!
-मी गृहमंत्री असतो तर सगळ्या बुद्धीवाद्यांना गोळ्या घालायल्या लावल्या असत्या- भाजप आमदार
-भाजप सरकारविरोधात मनसेचं ‘गाजर वाटप’ आंदोलन!
-संभाजी भिडे गुरूजीचं डोकं तपासायची वेळ आलीय- अजित पवार