बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आज ही वेळ ओढावली नसती’; अजित पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असं अजित पवारांनी म्हटलंय. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकार सिरम आणि परदेशी कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांट उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच ऑक्सिजन प्लांटस हे भविष्यात कोरोनाची साथ संपल्यानंतरही वाया जाऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या-

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

“येत्या दोन-तीन दिवसांत देशातील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचणार”

‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’; जवानाचा काळजाला पाझर फोडणारा आक्रोश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More