पुणे | दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशी मिश्किल टिपण्णी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलीये.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलच्या माध्यमातून जाहीर कार्यकर्ता मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना कृषी बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान करण्याचं आवाहन केले. अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याने कार्यकर्ता मेळाव्यातील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्याचे काम केलं. पत्रकार जरा कुठ गेलं तर अजित पवार नॉट रिचेबल. बाकी लोक आहेत की माझ्यामागेच का आहेत बाबा? एखाद्याच्या मागे लागायचं म्हणजे किती मागे लागायचं, असं अजित पवार म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-