बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. राज्यात आता बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बैलगाडा शर्यतीचा निर्णय ग्रामीण महाराष्ट्रासाठी महत्वाचा असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. ‘बरेच वर्ष आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आणि गाडा मालक यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. सरकार आली गेली पण विषय सुप्रीम कोर्टात असल्याने नाराजी पत्करावी लागायची’, असंही अजित पवार म्हणाले.

‘आमच्या सहकाऱ्यांनी याविषयी दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. काही लोकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं नसताना देखील काही भागामध्ये पोस्टर लावण्यात आलेच, अशी टीका देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर तब्बल सात वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज साहेब माझं काय चुकलं?”, पुण्यापाठोपाठ औरंगाबाद मनसेमधील अस्वस्थता उघड

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवली

अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शीना बोरा जिवंत, काश्मीरमध्ये तपास करा’; इंद्राणी मुखर्जींच्या दाव्याने देश हादरलं

अंकिता लोखंडेला पतीने लग्नात दिलं खास गिफ्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More