बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ देऊ नये हीच खरी श्रद्धांजली”

मुंबई | हिंगणघाट जळीत काडांवरुन राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. दारोडा गावातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पीडितेच्या मृत्यूनंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आरोपीला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळेलच, पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ नये हीच हिंगणघाटातल्या मृत बहिणीला आपली खरी आदरांजली ठरेल, असं म्हणत अजित पवार म्हणाले आहेत.

हिंगणघाटमधल्या बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे, असं अजित पवार, म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी

कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी

महत्वाच्या बातम्या-

शाहीन बागेतील आंदोलक कायमस्वरूपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

“हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी”

पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More