मुंबई | शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) खासदार आहेत. शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी (NCP) हे महाविकास आघाडीचे घटकपक्ष असताना शिरूरमध्ये पुढच्या वेळी शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) हे खासदार होतील, असं मोठं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.
शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावायला सुरूवात झाली. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी हे वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करेल, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.
दरम्यान, उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना (Sharad Pawar) आहे? संजय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आहे?, असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
थोडक्यात बातम्या-
काय सांगता? सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकला? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…
‘बाप’रे! 70 व्या वर्षी पुतिन पुन्हा बाप होणार; युद्धजन्य परिस्थितीत गर्लफ्रेंड प्रेग्नेंट
‘माझा संशयास्पद मृत्यू झाला तर…’; स्वत:च्याच मृत्यूबाबत Elon Musk यांचं खळबळजनक ट्विट
एकनाथ खडसेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले…
Comments are closed.