राष्ट्रवादीविरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार; अजित पवार म्हणतात…
सातारा | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीची तक्रार सोनिया गांधींकडे केल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय नाना पटोलेंनी राष्ट्रवादीवर (NCP) केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.
भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखित करार मोडून राष्ट्रवादीने भाजपसोबत (BJP) जाऊन सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची तक्रार नाना पटोले यांनी सोनिया गांधींकडे केली आहे. या तक्रारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगावं हा अधिकार त्यांचा आहे. आम्ही त्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. तर एका कुटुंबात भांड्याला भांडं लागत असल्याचंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, एका कुटुंबात भांड्याला भांडं लागतं तर तीन कुटुंबांमध्ये भांड्याला भांडं लागणारच ना. अशावेळी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी भांड्याला भांडं लागू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सरकार नीटपणे चालवलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, नाना पटोले स्पष्टच बोलले
हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणं; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
नाना पटोलेंच्या वक्तव्याने महाविकास आघाडीचं टेंशन वाढलं, म्हणाले ‘येणाऱ्या काळात…’
‘तिला मानलं पाहिजे’; सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेच्या पोस्टचं समर्थन?
मोठी बातमी! पोलीस अधिकाऱ्याच्या आणखी एका लेटर बॉम्बने खळबळ
Comments are closed.