Top News पुणे महाराष्ट्र

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्याच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पटोलेंनी अधिवेशनानंतर राजीनामा दिला असता, तर अधिक बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मी कशाला नाराज होणार. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच हे आधी ठरलं होतं. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला ठरलं होतं. चर्चा करतात, नाना पटोलेंनी सर्वांशी चर्चा केली. आघाडी सरकारमध्ये चर्चेनं मार्ग काढले जात असल्याचंं पवारांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसला पदं मिळाली आहेत. त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. काँग्रेसच्या हायकमांडने निर्णय दिला असल्याचंही पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोनावर सलमान खाननं सोडलं मौन; म्हणाला…

पाॅपस्टार रिहानाबद्दल भारतीय लोक इंटरनेटवर शोधत आहेत ‘ही’ धक्कादायक गोष्ट

रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!

…ही सवय आता बदलली पाहिजे; ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर जोरदार टीका

आपण बेसावध न राहता सावधगिरी बाळगण्याची गरज- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या