बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांच्या नातेवाईकांकडे आयकर विभागाने जप्त केली तब्बल एवढ्या कोटींची बेहिशेबी मालमत्ता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभर चर्चेत असणारा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर पडलेले आयकर विभागाचे छापे. या छाप्यावरून राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आता पहिल्यांदाच आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून आयकर विभागाने तब्बल 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या सीबीडीटी विभागाने ही माहिती दिल्याचं समजतंय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सीबीडीटीच्या प्रेस रिलीज आधारे अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या 184 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्याचा दावा केला आहे. 7 ऑक्टोबर रोजी आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात तब्बल 70 ठिकाणी आयकर विभागाची तपासणी सुरू होती. या छापेमारीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिन्ही बहिणींचा समावेश आहे.

संबंधित छापेमारीत 2.13 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता तर 4.32 कोटी रुपयांची ज्वेलरी आयकर विभागाने जप्त केली आहे. राज्यातील एका बड्या प्रभावशाली नेत्याच्या कुटुंबियांकडे ही संपत्ती सापडल्याचं सीबीडीटीने स्पष्ट केलं आहे. तसेच अजित पवार यांच्या नावाचा प्रेस रिलिजमध्ये कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नसला तरी ही संपत्ती अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडून जप्त केली असल्याचे स्पष्ट संकेत आयकर विभागाच्या सीबीडीटी या विभागाने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या –

पुढच्या वर्षी धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? धोनीने दिलं हे उत्तर

“हिंदूहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ संपता संपेना, परिक्षा केंद्रावरून पुन्हा गोंधळ

“…तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत?”

“आता आत्मविश्वासाने सांगतो आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी अगदी स्पष्टपणे दिसत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More